नेरळ :

आज मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात घेऊन नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब पोलीस चौकी येथील परिसरात पोलीस कर्मचार्‍यांकडून वृक्षारोपण करण्यात आले असून 100 वृक्ष लावले असून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ पोलीसवर्गाने घेतली.

कोरोनावर यशस्वीपणे मात करून आपल्या कर्तव्यावर  रुजू झालेले नेरळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी आपला एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी कळंब पोलीस चौकीच्या सुमारे एकर एकरच्या परिसरात  विविध प्रकारच्या शेकडो रोपांची लागवड करण्यात आली.

कोरोनावर यशस्वीपणे मात करत आपल्या सेवेत रुजू होताच एक आदर्शवत काम हाती घेऊन पोलीस स्टेशन परिसरात हिरवाई निर्माण व्हावी त्यासाठी सहकारी पोलीस कर्मचार्‍यांना प्रेरित करून अविनाश पाटील यांनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता. कळंब पोलीस चौकी परिसरात नारळ, आंबा, पेरू, चिंच अश्या विविध प्रकारची फळ झाडे व औषधी वनस्पती रोपांची लागवड केली.

लावलेल्या प्रत्येक रोपांची संवर्धन करण्याची जबाबदारी नेरळ पोलीस स्टेशन च्या कर्मचार्‍यांनी घेऊन पोलीस स्टेशनचा परिसर गर्द हिरवाईने नटवण्याची ग्वाही दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंजी, केतन सांगळे, तसेच विद्या चव्हाण, निरंजन दवणे, समीर भोईर, मुद्देमाल कारकून ठमके, पोलीस कान्स्टेबल भालेराव, एकनाथ गर्जे, होमगार्ड निरीक्षक पाटील, सुरेश बोडके, मनीष खुणे, समाजसेवक सुनील म्हसे उपस्थित होते.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....