Tuesday, April 13, 2021 | 12:47 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नेरळ-कळंब रस्त्याचे काम रखडले
रायगड
07-Apr-2021 04:15 PM

रायगड

। नेरळ । वार्ताहर । 

कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर परिसरात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण होणे बाकी आहे. रस्त्यावर करण्यात आलेले खडीकरण आणि त्यावर टाकण्यात आलेला मातीचा भराव यामुळे रस्त्यावरील धूळ वाहने जाताना मोठ्या उडत असून वाहन चालकांना श्‍वसनाचे आजार जडू लागले आहेत.

माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ पाडा येथील रेल्वे गेट आणि साई मंदिर परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण आणि काही भागात सिमेंट काँक्रीकरण ही कामे मंजूर होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने त्या रस्त्यावरील 500 मीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण केले आहे. रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्यावर सर्व भागात मातीचा भराव करून खडीकरण करण्यात आले. खडीकरण झाल्यानंतर निर्माण नगरी ते पाडा गेट या भागातील 300 मीटर भागात डांबरीकरण करण्यात आले होते. उर्वरीत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण करण्यात येणार होते, मात्र गेली दोन महिने त्या सिमेंट काँक्रीटकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केले नाही.

रस्त्यावरील सिमेंटचा भाग बनविला जात नसल्याने 200 मीटर परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारती आणि दुकाने यांच्यासमोर धूळ आणि मातीचे थर निर्माण झाले आहेत. त्याचवेळी रस्त्यावरून वाहने वेगाने जात असताना उडणारी धूळ यामुळे या भागातील सर्व लोकांना श्‍वसनाचे आजार जडले आहेत. त्यात या रस्त्यावरून वाहनानांची सातत्याने वर्दळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहन चालक धुळीच्या त्रासाने हैराण आहेत, त्या वाहनचालक यांच्याकडून रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटकरण कामाची मागणी होत आहे.

कळंब-नेरळ या रस्त्याचे काम करणारी एजन्सी काम करीत नसल्याने आम्ही स्थानिक ठेकेदाराला नेरळ पाडा गेट ते साई मंदिर भागातील रस्त्याचे काम करायला सांगीतले होते.मे महिन्यापूर्वी 200 मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण पूर्ण केले जाईल आणि सर्वांची गैरसोय दूर केली जाईल.

अजयकुमार सर्वगोड-उपअभियंता 

सार्वजनिक बांधकाम विभाग

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top