श्रीवर्धन 

 श्रीवर्धन शहरात व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे श्रीवर्धन नगरपरिषद तसेच व्यापारी संघटना यांनी श्रीवर्धन बाजारपेठ पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच सोमवारी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संपूर्ण रायगड जिल्हा 16 ते 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन म्हणजेच बंद ठेवण्यात येईल असे जाहीर केले आहे. किराणा मालाची व भाजीची दुकाने बंद असल्यामुळे श्रीवर्धन शहरातील व तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

बहुतांश नागरिक हे रोज मजुरी करून पैसे कमावणारे आहेत रोजच्या आलेल्या मजुरीतून किराणा सामान खरेदी करून ते आपल्या घरातली संध्याकाळची चुल पेटवतात. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. किराणा मालाची व भाजीची दुकाने उघडी ठेवली तरी पोलीस प्रशासनाने सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबत काटेकोरपणे पावले उचलल्यास संसर्ग टाळण्यासाठी अटकाव होईल असे शहरातील नागरिकांचे म्हणने आहे. लॉकडाऊन शिथिल करुन सोशल डिस्टंसिंगवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने श्रीवर्धन बाजारपेठेत अतिरिक्त बंदोबस्त ठेवून किराणामालाची दुकाने व भाजी ची दुकाने नागरिकांसाठी खुली करून द्यावी. जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. अनेक नागरिक व तरुण मुले मास्क न घालता फीरतात त्यांच्यावर देखील पोलिस प्रशासनाने कारवाई करावी. अशी मागणी जनतेमधून होऊ लागली आहे.

अवश्य वाचा