Tuesday, April 13, 2021 | 01:55 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्त संकलनाचे मिशन
रायगड
07-Apr-2021 04:05 PM

रायगड

 

। नेरळ । वार्ताहर ।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या आठ दिवसात संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद गट निहाय आणि शहर कमिटी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित केली जाणार आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यात सहा ठिकाणी 12 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील रक्त पुरवठ्याची टंचाई लक्षात घेऊन रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आदेश प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि शहर कमिटी यांनी स्वातंत्र्यपणे रक्तदान शिबीर आयोजित करावे असे सूचना केली आहे. पुढील आठ दिवसात सर्व गट आणि शहर कमिटी यांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार 8 ते 15 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top