Tuesday, April 13, 2021 | 12:46 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय लोक अदालत स्थगित
रायगड
07-Apr-2021 04:11 PM

रायगड

। अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील निर्देशाप्रमाणे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारी (दि.10) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने नियोजित राष्ट्रीय लोक अदालत ही पुढील आदेशापर्यंत तहकूब करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबागचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली आहे. तरी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलिस विभाग, वकील वर्ग, पक्षकार यांनी या बदलाबाबतची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष, जिल्हा विधी प्राधिकरण, रायगड-अलिबाग विभा इंगळे यांनी केले आहे

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top