Monday, March 08, 2021 | 07:54 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नैनासाठी मिळणार आयएएस अधिकारी
रायगड
25-Jan-2021 06:27 PM

रायगड

। नवी मुंबई । वार्ताहर ।

मुंबईपेक्षा तिप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचा विकास मागील अनेक वर्षापासून रखडला आहे.त्यामुळे नैनाच्या विकासाला गती देण्यासाठी सिडकोने आता कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नैना क्षेत्राच्या नियोजनासाठी पूर्ण वेळ आयएएस अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे.राज्य सरकारच्या संमतीने यासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

नैना क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारच्या मान्यतेने सहा मॉडेल तयार केले आहेत.यापैकी कोणत्याही एका मॉडेलचा स्वीकार करण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍यांना दिले गेले आहे. नगररचना परियोजना अर्थात टीपीएस योजना नैनाच्या विकासासाठी पूरक ठरणार आहे.त्यादृष्टीने सिडकोने एकूण 11 टीपीएस प्रस्तावित केल्या असून त्यापैकी तीन टीपीएसला शासनाची मंजुरीही मिळाली आहे.तर पहिल्या टीपीएस योजनेची अंमलबजावणीही सुरू केली आहे.परंतु नैनाचे क्षेत्र विस्तीर्ण आहे.दोन टप्प्यात 175 गावे विकासाच्या टप्प्यात आणली जाणार आहेत.याअंतर्गत एकूण 11 स्मार्ट शहरे वसविण्याची योजना आहे.मात्र सध्या हे काम कूर्मगतीने सुरू आहे.कामाचा वेग असाच राहिला तर नैना प्रकल्पाची योजना रसातळाला जाण्याची भिती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.त्यामुळेच या कामाला गती देण्याचा निर्णय संजय मुखर्जी यांनी घेतला आहे.सध्या नैनाचा क्षेत्राचा कार्यभार सहव्यवस्थापकीय संचालक अश्‍विन मुद्गल यांच्याकडे आहे.

नियोजन व महसूल विभागात समन्वयाचा अभाव

नैना क्षेत्राचा विकास रखडण्यामागे सिडकोच्या नियोजन अर्थात प्लानिंग आणि महसूल विभागातील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही प्रकल्पाच्या विकासाचे मुख्य अंग असलेल्या या दोन्ही विभागात समन्वय राहिल यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. नैना क्षेत्राच्या विकास प्रकल्पात हे दोन्ही विभाग एकत्र कार्यरत राहणे गरजचे असल्याने येत्या काळात त्यादृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top