वाकण

 नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन शनिवारी (3 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजता नागोठणे बाजारपेठेतील आराधना भवन हॉल, येथे संपन्न होत आहे.

 यानिमित्त नागोठण्यातील पत्रकार उदय भिसे यांना संघटनेचा मानाचा कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर रोहा येथील पत्रकार अल्ताफ चोरडेकर यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार तर गुहागर (रत्नागिरी) येथील पत्रकार उमेश शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन संघटनेतर्फे गौरविण्यात येणार आहे.

 खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली  होणार्‍या कार्यक्रमास   पालकमंत्री  अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 या वर्धापन दिनानिनिमित्त संघटनेच्या संकल्प या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन तसेच नागोठणे विभागात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कारही संघटनेतर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष शामकांत नेरपगार व अध्यक्ष अ‍ॅड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष धम्मशील सावंत, सचिव अ‍ॅड. विजयपाल सावंत, खजिनदार किशोर कदम, सह सचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, अनिल पवार, सुनील कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, सचिन नेरपगार, राजेश पिंपळे यांच्याकडून सुरु आहे. 

अवश्य वाचा