रेवदंडा 

  चौल ग्रामपंचायतीच्या वतीने माझं कुटूंब, माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेचा शुभारंभ  ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला. यावेळी  राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग पं.स.गटविकास अधिकारी  डॉ. दिप्ती पाटील, रेवदंडा  आरोग्य केद्रांचे डॉ. वाघमोडे, चौल  सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच अजीत गुरव, सदस्य, अजीत मिसाळ,ग्रा.प.सदस्य अतुल वर्तक,  सदस्या रूपाली म्हात्रे, ग्रामसेवक श्रीहरी खरात आदी मान्यवरासह चौल ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामसेवक श्रीहरी खरात यांनी केले.

 यावेळी चौल ग्रामपंचायत हद्दीत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका, यांच्या एकूण आठ टीम तयार करण्यात आल्या असून त्यांना ग्रामपंचायतीचे वतीने आरोग्य तपासणी करण्याकरीता मास्क. सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, तापमापक यंत्र, मान्यवर उपस्थितांचे हस्ते देण्यात आले. तसेच चौलच्या चंपावती स्वयंम साहय बचत गटाचे अध्यक्षा रेखा संदिप घरत यांच्या  भारत सरकारचे वतीने कौशल्य विकास तथा उदयोजगकता मंत्रालयाचा कौशल्याचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल पं.स.गटविकास अधिकारी डॉ. दिप्ती पाटील यांचे हस्ते विशेष सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.

  चंपावती स्वयंम साहय बचत गटाचे  वतीने 41 हजार मास्कची  निर्मिती तीन महिन्यात करण्यात आली, व या मास्कची  माफक दरात विक्री करण्यात आली. तसेच निसर्ग चक्रीवादळात चौल ग्रामपंचायत हद्दीत चारशे ते पाचशे विद्युत पोल पडले होते तसेच तारा निखळून पडल्या होत्या, हे सर्व काम अवघ्या पंधरा दिवसात मार्गी लावणारे वायरमन निळकंठ सोळंखी, शरद गोसावी, आकाश वाडीले यांच्या सत्कार त्यांना बदलीचा निरोप म्हणून करण्यात आला.  

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त