पेझारी 

 कोरोना रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शासनातर्फे राबविण्यात आलेल्या ममाझे कुटुंब,माझी जबाबदारीफ या मोहिमेचे आंबेपूर ग्रामपंचायतीमध्ये उदघाटन करण्यात आले व ही मोहीम कशी यशस्वी होईल याकरिता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर,समिती सदस्या रचना थोरे-पाटील, पेझारी ग्रामपंचायत माजी सरपंच मनीषा पाटील, जिल्हा पर्यवेक्षक डॉ.चौलकर,डॉ. प्रवीण पाटील,पोयनाड आरोग्य केंद्राचे राजा पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात  जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा पर्यवेक्षक डॉ. चौलकर यांनी मार्गदर्शन करून विशेष मोहिमेची माहिती दिली व ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन केले. पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंतेश्‍वर व डॉ. भक्ती पाटील यांनी प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी मोठी असून सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी व्हावे अशी सूचना केली. या कार्यक्रमात आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 

अवश्य वाचा