मुरुड 

  मुरुड समुद्र किनारी मंगळावर दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळेत सुमारे पाच फूट लांब व 150 किलो वजन असलेला एक भला मोठा डॉल्फिन मुरुड च्या समुद्र किनारी आढळून आला. महिन्यापूर्वीच असाच एक मोठा डॉल्फिन समुद्र किनारी वाहून आला होता काही दिवसातच हा दुसरा डॉल्फिन मृत अवस्थेत समुद्र किनारी आल्याने निसर्ग प्रेमी लोकांकडून हळ हळ व्यक्त करण्यात आली आहे.

  सदरच्या डॉल्फिन ची वन विभागाला वृत्त कळताच मुरुड वन विभागाचे वन क्षेत्रपाल प्रशांत पाटील यांनी तातडीने  नियत क्षेत्र वन अधिकारी किरण जाधव यांना  तातडीने या ठिकाणी पाठवण्यात आले.यावेळी त्यांनी मुरुड नगरपरिषदेला याबाबतची माहिती दिली नगरपरिषदेकडून एक मोठा जेसीबी पाठवण्यात आला होता.व सदरील माशाला गाढण्यात आले.    पशुधन अधिकारी डॉ विनायक पवार यांनी या माश्याचे शवविच्छेदन केले 

 

अवश्य वाचा