खोपोली  

खोपोली नगरपालिका कार्यालय नूतन इमारतीत सुरु करण्याच्या हालचाली सत्ताधार्‍यांकडून सुरु आहेत.त्यास नगरसेवक किशोर पानसरे यांनी विरोध दर्शविला आहे.शहरात कोरोनाची साथ असताना उद्घाटनाचा घाट कशासाठी अशी विचारणा त्यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रारही करण्यात आलेली आहे.   कोरोना महामारीची परिस्थिती निवळल्यानंतर इमारत उद्घाटनासाठी निर्देश द्यावेत अशी विनंती नगरसेवक पानसरे यांनी केली आहे.

 

अवश्य वाचा