कर्जत

निसर्ग चक्रीवादळामुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, या काळात नगरपरिषद आणि वीज वितरण कर्मचार्‍यांनी केलेल्या कामगिरीचे कर्जतकरांनी विशेष कौतुक केले आहे.
दि. तीन जून रोजी झालेल्या निसर्ग वादळामुळे कर्जत तालुक्यात मोठ्या नुकसान झाले, अनेकांच्या घराचे छप्पर उडाले, शेतकर्‍यांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या, विज वितरण कंपनीचे अनेक पोल पडले, त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला,ग्रामपंचायत, नगरपरिषद पाणी योजनांवर त्याचा थेट परिणाम झाला.
अशा परिस्थितीत नगरपरिषदेचे कर्मचारी सुदाम म्हसे आणि त्याची टीम तसेच सुनील लाड यांची टीम ,आणि महावितरणचे कंपनीचे इंजिनीयर साबळे आणि कर्मचारी, यांनी उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत घेऊन पडलेली सर्व झाडे बाजूला करून रस्ते त्वरित मोकळे केले आणि विद्युत पुरवठा सुरू करण्याची कामगिरी बजावली. काल दि 4 जून रोजी रात्री पर्यंत शहरातील काही भागात विद्युत पुरवठा सुरू झाला असून इतर ठिकाणी काम चालू आहे.
कर्जत नगरपरिषदेची पाणी पुरवठा योजना वंजारवाडी येथील पेज नदीवर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडून वीजेच्या वाहिन्यावर पडली त्यामुळे कर्जत शहराला एक दिवस म्हणजे काल दि.4 जून रोजी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. मात्र वंजारवाडी येथे असलेल्या पंपिंग स्टेशन च्या बाजूला अजून पोल उभारण्याचे काम चालू असल्याने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरपरिषदेने जनरेटरच्या माध्यमातून सर्व शहरात पाणीपुरवठा केला या कामात पाणी पुरवठा अभियंता अशोक भालेराव यांनी पुढाकार घेतला आणि नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांनी शहराला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. आज दि.5 जून रोजी कर्जतकरांना सकाळी पाणी पुरवठा झाला.
चक्रीवादळामुळे कर्जत नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात कचरा, झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या त्या त्या प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांनी सफाई कर्मचार्‍यांकडून आपल्या परिसरातील तो कचरा उचलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कर्जत पुन्हा पूर्वीसारखे स्वच्छतेच्या मूळ प्रवाहात लवकरच येईल अशी खात्री नगराध्यक्षा जोशी यांनी दिली.
चक्रीवादळात नगरपरिषद कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीच्या दोन्ही कर्मचार्‍यांनी समन्वय साधून काही तासातच अत्यावश्यक सेवा पूर्ववत आणली त्याबद्दल दोन्ही कर्मचार्‍यांचे कर्जतकरांना विशेष कौतुक केले आहे.

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ