नवी मुंबई

 लॉक डाऊनच्या काळात मराठी कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अचानक कामावरून काढले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चांगलीच आक्रमक झालेली पहायला मिळाली.

 नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात मनुष्यबळ पुरवणार्‍या कंत्राटदार एक्सिमिस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक 40 मराठी कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे या कंत्राटदार कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामगारांचा मोर्चा काढला. यावेळी कंत्राटदार कंपनीच्या विरोधात मनसेच्या कामगार सेनेकडून जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. मनसे कामगार सेनेच्या आंदोलनानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 यावेळी आंदोलनात राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी युनियनचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, मनसेचे शहर सहसचिव अभिजित देसाई, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, विभाग अध्यक्ष विनोद पाखरे, शाखा अध्यक्ष अक्षय कदम, उपशाखा अध्यक्ष मंगेश चौगुले, उपशाखा अध्यक्ष निखिल नेटके, उपशाखा अध्यक्ष पुंडलिक पाटील, उपशाखा अध्यक्ष अजय तारकर हे उपस्थित होते.

 

अवश्य वाचा