नागोठणे 

कोरोना विषाणूंच्या महामारीत वारंवार लॉकडाऊनच्या घोषणा होत असल्या तरी, काही व्यवसाय चालू होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पाचव्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आमच्याकडे शासनाने दुर्लक्षच केले असल्याने आम्ही सर्व मिनिडोर रिक्षा चालक मालक देशोधडीला लागण्याची वेळ आली असल्याचे येथील मिनिडोर चालक मालक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकारी तसेच सभासदांनी हताशपणे स्पष्ट केले.

येथील मिनिडोर चालक मालक कल्याणकारी संस्थेच्या अंतर्गत साठ मिनिडोर रिक्षा नागोठणे ते पाली, सुकेळी, आमडोशी, कोलाड या मार्गावर व्यवसाय करीत आहेत. मार्च महिन्यात कोरोनाच्या विषाणूंची लागण झाल्यानंतर 22 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्या अनुषंगाने आमच्या व्यवसायाला सुध्दा ङ्गलॉकफ बसला असून अद्यपपर्यंत हा लॉक खुलाच झाला नसल्याने चालक तसेच मालक व्यवसायाविना घरीच बसले असून आम्हा सर्वांची उपासमारच होत असल्याचे किशोर पवार, रवी यादव, संतोष कदम या पदाधिकार्‍यांसह सभासदांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. निजाम सय्यद यांचे सहकार्यातून नाझीमभाई नालखंडे यांनी एप्रिल महिन्यात सर्व चालक मालकांना अन्नधान्याचे वाटप केले होते. आता पावसाळा तोंडावर आला आहे. व्यवसाय बंदच असल्याने पावसाळ्यात आमच्या कुटुंबाने खायचे तरी काय, असा सवाल काही सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....