Tuesday, April 13, 2021 | 12:50 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

एमआयडीसीने विकास आराखडा सादर करावा
रायगड
07-Apr-2021 04:13 PM

रायगड

 

। पेण । प्रतिनिधी । 

पेण तालुक्यातील वडखळ, डोलवी, गडब परिसरात एकूण दहा गावांमधील 2120 एकर जमिन अधिग्रहित करण्यासंदर्भात स्थानिक शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता नोटिफिकेशन जारी केले आहे. मुळात एमआयडीसीने संपूर्ण विकास आराखडा सर्वप्रथम स्थानिकांसमोर सादर करावा अशी मागणी शेकापचे युवा नेते प्रसाद भोईर यांनी केली आहे.

प्रयोजित प्रकल्प संकुलात कोणकोणत्या कंपन्या येणार आहेत. प्रत्येक कंपनीतून किती भांडवल उभारले जाणार आहे, किती नोकर्‍या व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वैगरे सर्व माहिती सर्वप्रथम जनतेसमोर सादर कराव्यात. या सर्वांनंतरच शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी प्रकल्पाकरिता द्याव्यात किंवा नाही याचा विचार करावा, असे आवाहन शेकाप युवा नेते प्रसाद भोईर यांनी केले आहे.

नविन भुसंपादन कायदा 2013 अनुसार बाजार भावाच्या तिप्पट रक्कम मोबदला म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे जमिन मालकाला देण्यात येते. परंतु गावागावातील बाजार भाव वेगवेगळे आहेत. त्यामुळे दहा गावातील लोकांना मिळणारा मोबदला हा कमी जास्त स्वरूपात असमान असेल. तेव्हा संपादित होणार्‍या गावांपैकी ज्या गावात असा मोबदला हा सर्वात जास्त असेल तोच इतर सर्व गावांना लागू व्हावा. संपादन संस्था एकच व एकत्रच औद्योगिक प्रकल्पाकरिता संपादन असल्याने कमी जास्तीचा मोबदला हा शेतकऱयांवर अन्यायकारक असेल. तसेच संपादित होणार्‍या घरांची नुकसान भरपाई ही चालू बाजारभाव व नविन घर बांधण्याकरिता वाढती महागाई लक्षात घेता लागणारा खर्च याचा सारासार विचार करूनच बाधित घरांचे व इतर बांधकामाचे मोबदला मिळावा. प्रायोजित संपादित क्षेत्रातील ज्या जमिनी कुळाच्या आहेत व जिथे अजूनही खोतांची नावे सातबारा सदरी दाखल आहेत अशांच्या जमिनीवरील सदरील खोतांची नावे कमी करून भोगवाटादार सदरी कुळांची नावे कायम करण्याबाबत महसूल यंत्रनेने स्वतःहून नोंद करून घ्यावी अन्यथा कसणार्‍या शेतकर्‍यांना 40 टक्के मोबदल्याला मुकावे लागेल अशी भीती  प्रसाद भोईर यांनी बोलताना व्यक्त केली आहे

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top