म्हसळा

म्हसळा तालुका काँग्रेस च्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा  डॉ.मुईज शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप यांनी सुपूर्द केले. डॉ.मुईज शेख हे या पूर्वीही तालुका काँग्रेस च्या अध्यक्ष पदी होते परंतु काही गैरसमजुतीमुळे काही दिवस त्यांना दूर राहावे लागले. दरम्यानच्या काळात ते कुठेही गेले नाहीत,अगर कोणतीही पक्षविरोधी कारवाही न करता त्यांनी पक्षनिष्ठा सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या परीने पक्षासेवा करीत राहिले. त्यांच्या या पक्षनिष्ठेमुळे त्यांनी  पक्षातील वरीष्ठ नेत्यांची मर्जी जिंकली आणि पुन्हा एकदा डॉ.मुईज शेख यांची म्हसळा तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

डॉ.मुईज शेख हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने जनसामान्यांमध्ये प्रभावी नेतृत्व करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांजवळ स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.त्यांच्या निवडीने सर्व पक्षाच्या मंडळींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप यांनीही डॉ.मुईज शेख यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष भुरे,रफिक घरटकर,हुर्जूक आदी मान्यवर उपस्थित होते.