माणगाव 

संपूर्ण जगभरात हैदोस घालणार्‍या कोरोना संसर्गजन्य विषाणूचे रुग्ण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात सातत्याने आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांची चिंता वाढली आहे.गेल्या तीन दिवसांत तालुक्यात नवीन 18 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले यांनी प्रसार माध्यमांना दिली.

माणगाव तालुक्यात मंगळवार दि.4 ऑगस्ट रोजी 10 रुग्णांचा तर 5 ऑगस्ट रोजी 8 रुग्णांचा  असे एकूण 18 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तालुक्यातील माणगाव नगरपंचायत हद्दीत  14रुग्ण,गोरेगाव येथे 2 रुग्ण,तळेगाव येथे 1 रुग्ण व माकटी येथे 1 रुग्ण आढळला आहे.माणगाव तालुक्यात दि.6 आँगस्ट   पर्यंत 375 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 304 जण आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नांनंतर आणि स्वतःच्या इच्छाशक्ती आणि प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.सध्या तालुक्यात 68 रुग्ण कोरोनाने बाधित आहेत.माणगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डॉ.प्रदीप इंगोले व सहकारी रुग्णांना चांगली सेवा देत असल्याने रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आता रॅपिड अँटीजनची सुविधा उपलब्ध झाल्याने याठिकाणी रुग्णांचा कोरोना अहवाल आता फक्त अर्ध्या तासात प्राप्त होत आहे. कोरोना आजार बरा होत असल्याने ज्यांना कोणाला सर्दी, खोकला, ताप, श्‍वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखवून  त्यावर औषधोपचार करून घेणे असे डॉ.इंगोले यांनी सांगितले.तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी सरकारच्या सुचनांकडे लक्ष देवून गांभीर्यपूर्वक सर्व नियमांचे पालन केल्यास आपण कोरोना विरूद्धची लढाई जिंकू असा विश्‍वास तालुक्याच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रशाली जाधव दिघावकर यांनी व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही