श्रीवर्धन

श्रीवर्धन तालुक्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी हे अभियान सुुरु करण्यात आले असून,कोरोनासह अन्य साथींचा अटकाव करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हे अभियान यशस्वी करावे,असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी श्रीवर्धन तालुक्यात केले.

पालकमंत्र्या समवेत प्रांताधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी , मुख्याधिकारी किरण मोरे ,गटविकास अधिकारी भोगे ,नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक  तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी  उपस्थित होते.

   या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना अदितीताई म्हणाल्या    प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक तपासणीसाठी श्रीवर्धनमध्ये 92 पथके तैनात करण्यात आले आहेत .ही पथके दिवसातून दोन वेळा घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत . प्रत्येक पथक किमान 50 कुटुंबांची तपासणी घेऊन आरोग्य विषयक माहिती संकलित करणार आहे .

    ही मोहीम 15 सप्टेंबर  ते 25 ऑक्टोबर 2020  या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.   पहिली फेरी 15 सप्टेंबर 2020 ते 10 ऑक्टोबर 2020  आणि दुसरी फेरी 14 ऑक्टोबर 2020 ते  24 ऑक्टोबर 2020   या कालावधीत घेण्यात येणार असुन पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवस व दुस-या फेरीचा काळावधी 10  दिवसांचा असल्याचे सांगितले. मोहिमेत अदिती तटकरे यांनी  स्वतः पथकात सहभागी होऊन नागरिकांनां तापमान व ऑक्सिजन तपासून विचारपूस केली .

अवश्य वाचा