महाड 

संपुर्ण जगात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातले असताना महाराष्ट्रा मध्ये या संकटाशी सामना करण्यासाठी खंबीरपणे पावले उचलण्यांत आली,सर्व सोई सुविधा उपलब्द करुन देण्यांत आल्या आणि ही साथ नियंत्रणा मध्ये आणण्यांचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला असे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.

 केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

 यावेळी पालकमंत्री  आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरत  गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, डॉ. फैसल देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, गेले काही  महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर उभे केले व या करोनाच्या साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे, म्हणूनच हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणार्‍या तुम्हा सर्वांचे आहे.

          यावेळी  पालकमंत्री  आदिती तटकरे,खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत  गोगावले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी कोविड केअर सेंटर बाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.  या कार्यक्रमाला महाड परिसरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन