Wednesday, May 19, 2021 | 01:19 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोरोनाग्रस्तांसाठी जेएसडब्ल्यूची संजीवनी
रायगड
02-May-2021 07:45 PM

रायगड

| पेण | प्रतिनिधी |

जेएसडब्ल्यू स्टील डोलवी व जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांच्याद्वारे पेण तालुक्यातील वडखळ येथे स्थापन करण्यात आलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड सेंटरचे महाराष्ट्र दिनी, 1मे  रोजी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जेएसडब्ल्यू स्टील डोलवीचे अध्यक्ष गजराज राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह इतर आरोग्य सुविधांयुक्त 100 बेड्सची सुविधा देण्यात आलेली असून, ही सुविधा येत्या काळात वाढविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त जेएसडब्ल्यू स्टीलद्वारे एमएमआर विभागातील तीन जिल्ह्यांना दर दिवशी तीनशे मेट्रिक टन मेडिकल लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो.

याप्रसंगी जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्ष संगिता जिंदल व पार्थ जिंदल तसेच रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्‍विनी सक्सेना, डॉ. आशिष जैन, कॅप्टन राजेश कुमार रॉय, नारायण बोलबुंडा, विनायक दळवी, आत्माराम बेटकेकर, बळवंत जोग, किरण म्हात्रे, संतोष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top