रसायनी  

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू, गायनाचार्य, निरुपणकार, भजनसम्राट मधुकर उर्फ मधुबुवा कदम यांचे आकस्मिक निधन झाले. कोयना प्रकल्पग्रस्तांचे नेते कै. जयसिंगराव कदम यांचे ते सुपुत्र होत. मुंबई कुर्ला येथील अंबिका या नामवंत मंडळाचे ते कबड्डीपटू होते. वावंढळ(कोयना-जांब्रूक) येथील व्यायामपटू ते ट्रेनर होते. भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमातील उत्कृष्ट गायक व वाद्य वाजविण्यात निष्णात होते. जय भवानी तरुण मंडळाचे व व्यायाम शाळेचे संस्थापक होते. कोयना क्षत्रिय मराठा समाजाचे ते उपाध्यक्ष होते. गावच्या व परिसरातील भाविकांच्या आळंदी व पंढरपूर यात्रेतील दिंडीचालक होते. सामाजिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राबरोबर त्यांच्या विक्रीकर विभागातूनही त्यांना अनेकवेळा गौरविण्यात आले आहे. मुंबई विक्रीकर विभागाच्या कबड्डी संघाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहेे.

 

अवश्य वाचा