महाड

महाड शहरात मागील चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई कशी करणार अशी चिंता त्यांना सतावत आहे.

 महाड शहरामध्ये पुर येणे नवीन नाही,गेल्या अनेक वर्षा पासुन शहरांमध्ये पुराचे पाणी येत असल्याने नागरिकांना देखिल पुराच्या पाण्याची आता सवय लागली आहे.मात्र कधी कधी पुराच्या पाण्याचा अंदाज चुकतो आणि प्रमाणा पेक्षा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तर मात्र नारिकांचे प्रचंड नुकसान होते.

शहरांमध्ये पुराचे पाणी येण्याला येथील भोेैगोलिक परिस्थिती जबाबदार आहे.चारही बाजुने सह्याद्रीचे डोगर आणि त्या मध्ये महाड शहर वसलेले असुन सावित्री,काळ आणि गांधारी नदीचा संगम देख्लि याच शहरामध्ये होतो.पावसाळ्या मध्ये या तीनही नद्याना पुर आल्या नंतर शहरांत पुराचे पाणी शिरते त्याच बरोबर तालुक्याच्या कांही सखल भागालाही पुराच्या पाण्याचा फटका बसतो. दरवर्षी शहरांत पाच ते सात पुैट पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते परंतु अचानक दहा ते पंधरा पुैटा पर्यत पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांचे व्यापाछयाचे अतोनात नुकसान होते.या वर्षी मंगळवार पासुन पावसाचा जोर वाढला आणि बुधवारी शहराच्या कांही सखल भागांत पुराचे पाणी शिरले.प्रशासना बरोबर नागरिक देखिल सावध झाले परंतु 5 जुलै बुधवारी सकाळी पाण्याच्या पातळी मध्ये वाढ झाली,सखल भागांमध्ये सात ते आठ पुैट तर कांही भागांमध्ये दहा पुैटा पेक्षा अधिक पाणी होते.पाण्याची पातळी वाढल्याने अनेकांच्या घरांत पाणी शिरले,जीवनावश्यक वस्तुंसह घरांतील सामानांचे नुकसान झाले.कांहीचे प्रिैज टिव्ही पुराच्या पाण्याने भिजल्याने नुकसान झाले तर बाजार पेठेमध्ये किराणा मालाच्या दुकानांतील हजारो रुपंयाचा माल भिजल्याने नुकसान झाले.तसेच कापडाचे व्यापारी,धान्य विक्रीते,हॉटेल,पानाच्या टपछया,चहाची दुकाने इत्यादीचे या पुरा मध्ये प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्याच्या ग्रामिण भागाला देखिल अविवृष्टीचा फटका बसला असुन कोतुर्डे गांवामध्ये दरड कोसळून एक बैल आणि म्हैस दरडी खाली सापडले असल्याचे प्रशासना कडून सांगण्यांत आले,त्याच प्रमाणे वादळी वारे आणि अतिवृष्टी मुळे किल्ले रायगड परिसरांमध्ये असलेल्या वाघेरी,पाने,पंधेरी,दापोली या गावांतील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.नडगाव परिसरांमध्ये माातीचा भराव एका घरावर कोसळून नुकसान झाले,सुदैवानी कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

पुराचे पाणी गुरुवारी दुपार नंतर बाजार पेठेतुन कमी झाल्या नंतर व्यापाछयानी आपल्या दुकानांची साफ सफाई करण्यास सुरवात केली,अनेक दुकानांमधील भिजलेल्या धान्याची दुर्गधी पसरण्यास सुरवात झाल्याने पालिके कडून तातडीने सफाईचे काम हाती घेण्यांत आले आहे.कोराना महामारी,लॉकडाऊन आणि पुरा मुळे महाड शहरांतील व्यापारी पुर्णपणे खचला असुन शासनाने छोटे दुकानदार,दुर्बल घटकांना अर्थिक मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक डॉ.चेतन सुर्वे, सुनिल आगरवाल,चेतन पोटफोडे,शिवसेनेचे शहर अध्यक्ष नितीन पावले, यांनी केली आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही