श्रीवर्धन  

श्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बसफेर्‍या सुरू व्हाव्यात अशी मागणी गेले अनेक दिवस प्रवाशांमधून होत होती. संपूर्ण देशामध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. श्रीवर्धन शहरात सर्व आजारांवरती वैद्यकीय उपचार होत नसल्याने अनेकांना मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागते. अशा उपचार घेणार्‍या अनेक नागरिकांची एसटी सेवा बंद असल्यामुळे गैरसोय होत होती.

श्रीवर्धन परिवहन आगाराने या अगोदरच श्रीवर्धन बोरली पनवेल व श्रीवर्धन पनवेल या दोन फेर्‍या सकाळच्या वेळात सुरू केल्या होत्या. तर परतीच्या प्रवासासाठी पनवेल बोरली श्रीवर्धन ही बसफेरी दुपारी एक वाजता पनवेल येथून सुटते. तर श्रीवर्धन साठी येणारी पनवेल श्रीवर्धन बस दुपारी अडीच वाजता पनवेल येथून सुटते. मात्र श्रीवर्धन आगाराने आता गणेशोत्सव तोंडावर येत असल्याने काही लांब पल्ल्याच्या अजून फेर्‍या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये श्रीवर्धन बोरली नालासोपारा, श्रीवर्धन बोरली भांडुप, तर श्रीवर्धन नानवली मुंबई या बस फेर्‍या उद्यापासून सुरू होणार असून या बस श्रीवर्धन येथून सकाळी सुटून रात्री साडेनऊ वाजता नालासोपारा, भांडुप व मुंबई येथून श्रीवर्धन करता सुटणार आहेत तसेच. श्रीवर्धन आगाराने श्रीवर्धन पुणे ही सुद्धा बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही