रसायनी 

चौक परिसरात कोरोना रुग्णांची संख्यावाढत जात असल्याने चौक ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

चौक ग्रामपंचायत हद्दीत व परिसरातील गावांत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे,त्यामुळे या परिसरात भीतीचे सावट पसरले आहे,ही साखळी वेळीच तोडली नाही तर परिसरात कोरोनाची महामारी पसरण्याची भीती आहे,त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी सर्व जनतेस व व्यापारी यांना शुक्रवारी दि.3 जुलै 2020 रात्री 9.00 पासून 8 जुलै 2020 रोजी रात्री 9.00 वाजेपर्यंत बंद चे आवाहन केले आहे.या दरम्यान सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत म्हणजे एक तास दूध विक्रीसाठी देण्यात आला असुन वैद्यकीयसेवा कायमस्वरूपी सुरू राहील.विनाकारण बाहेर पडेल व तोंडाला मास्क नसणार्‍यास  500/- दंड आकारण्यात येऊन कोविड-19 च्या अंतर्गत कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे ग्रामपंचायत चौक यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.याबाबत व्यापारी असोसिएशन ला माहिती नसल्याचे व्यापारी यांच्याकडून समजते,तर नाशिवंत माल विक्रीसाठी वेळ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले,तरीही ग्रामपंचायत यांचा निर्णय मान्य असल्याचे व्यापारी यांनी सांगितले.या बंद मध्ये सर्व जनतेनेही व व्यापारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी जाधव व प्रभारी सरपंच सुरेश घाग यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा