Wednesday, December 02, 2020 | 01:41 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

नेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल
रायगड
31-Oct-2020 04:54 PM

रायगड

दांडगुरी

 श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये मोबाईल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.  कित्येक महिन्यांपासून अधिकार्‍यांना सांगून देखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आता तरुणवर्ग थेट मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन करणार आहेत. त्याबाबत चे पत्र थेट व्होडाफोन व आयडीया च्या पुणे कार्यालयाला धाडले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील  बहुतेक पक्ष आपापल्या परीने नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र मोबाईल कंपन्या त्यांनाही जुमानत नसल्याचे दिसते.बोर्लीपंचतन मधील काही तरुणांनी एकत्र येऊन   ला पत्र दिले आहे त्यात 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान च कालावधी ची मुदत दिली आहे. यादरम्यान जर कॉल व इंटरनेट सेवा सुधारली गेली नाही तर थेट हजारो तरुण मोबाईल टॉवर वर जाऊन आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशी प्रत ही तहसीलदार व पोलिसांना दिली आहे.

 श्रीवर्धन हे पर्यटन स्थळ आहे. दिवेआगर, बोर्ली, वेळास तसेच शिस्ते, वडवली यांसह इतरही अनेक छोट्या-मोठ्या खेडेगावांना व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल, जिओ या कंपन्या मोबाइल नेटवर्क सेवा देत आहेत. त्यामध्ये सर्व कंपन्यांना चांगला ग्राहक वर्गदेखील आहे; परंतु मागील वर्षभर या सर्व कंपन्यांचे मिळत असलेले नेटवर्क सुमार दर्जाचे असून अनेक वेळा प्रयत्न करूनही कॉल न लागणे, वारंवार खंडित होणारे नेटवर्क, इंटरनेट सेवादेखील व्यवस्थित नसल्याने कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणामध्येदेखील खोडा बसत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ग्राहकांनी अनेकवेळा कंपन्यांच्या ग्राहक सेवेकडे तक्रार नोंदवूनदेखील कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आली आहे

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top