Monday, January 18, 2021 | 03:03 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

कुरुळचे सुपूत्र राघवेंद्र सलगर झाले कर्नल
रायगड
12-Jan-2021 07:34 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे अलिबाग तालुक्यातील कुरुळचे सुपूत्र राघवेंद्र पृथ्वीराज सलगर यांना वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी कर्नल या पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राघवेंद्र सलगर यांचे शालेय शिक्षण आर.सी.एफ स्कूल अलिबाग येथे झाल्यानंतर भोसला मिलटरी स्कूल नासिक येथ पुढील शिक्षणे पूर्ण केले. पुढे स्पर्धात्मक परीक्षे मधून डर्शीींळलशी झीशरिीरीेीूं खपीींर्ळीीींंश,र्-ीीरपसरलरव या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला येथे एन. डी. ए. च्या परिक्षेचीची पूर्वतयारी करून , णझडउ/डडइ सेलेक्शन  बोर्डाच्या स्पर्धात्मक परीक्षेतून, यशस्वीरित्या पास होऊन एन. डी. ए. या नामांकित संरक्षण संस्थेत प्रवेश मिळवला. नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधील तीन वर्षाच्या खडतर लष्करी प्रशिक्षणानंतर खपवळरप चळश्रळींरीू अलरवशू (आय एम ए) देहरादूनमध्ये, एक वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण करून भारतीय सैन्य दलात कमिशन्ड ऑफिसर म्हणून रूजू झाले. सुरुवातीच्या काही काळानंतर, त्यांना इंडियन पिस कीपिंग फोर्स च्या वतीने, काँगो, साऊथ आफ्रिका येथे कार्य करण्याची उत्कृष्ट संधी मिळाली. तिचे सोने करीत त्यांनी बेस्ट ऑफिसर अवॉर्ड पटकावले. भारतात परत आल्यावर, जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये ते दाखल झाले. या युनिटमध्ये असताना त्यांना अतिशय जोखमीचे साहसाचे काम करण्याच्या बर्‍याच संधी उपलब्ध झाल्या. तेथे काही अतिरेक्यांशी सामना करत असताना, दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना सेना मेडल (गॅलएन्ट्री)चे अवार्ड मिळाले.

काही काळानंतर त्यांचे आर्मी एव्हिएशनमध्ये हेलिकॉप्टर पायलटच्या ट्रेनिंगसाठी सिलेक्शन झाले. अलाहाबाद व नाशिक येथील पायलटच्या प्रशिक्षणानंतर, हेलिकॉप्टर पायलट ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि बॉर्डर मॉनिटरिंग, व्हीआयपी व्हिजीट, अशाप्रकारे त्याच्या कामाचे स्वरूप होते. हेलिकॉप्टर पायलटच्या यशस्वी कारकीर्दीनंतर परत त्यांना भारतीय सैन्य दलात म्हणजे चिलखती दलामध्ये प्रवेश मिळाला. येथे जम्मू कश्मिरमध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असताना, त्यांच्या शेजारील कॅम्प वर अतिरेक्यांचा हल्ला झाला. बातमी समजल्यानंतर ताबडतोब ते पहाटे घटनास्थळी पोहोचून अतिरेक्यांनी शिरलेल्या बिल्डिंगला घेराव घातला आणि त्यांना ओलीस ठेवले. यावेळी काही निर्दोष रहिवासींना अतिरेक्यांनी मारले. अशा कठीण परिस्थितीत जिवाची पर्वा न करता इमारतीत घुसून तळ मजल्यावर जखमी झालेले स्त्रियांना, मुलांनाआणि काही इतर बर्‍याच लोकांना सुरक्षितस्थळी पोहचवले व काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या सर्व ऑपरेशनमध्ये त्यांनी अतिशय जोखमीचे, मोलाची कामगिरी बजावली आणि वरिष्ठा वरिष्ठांकडून शाबासकी मिळवली.

कर्नल या पदासाठी आवश्यक असलेली स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन स्टाफ कॉलेज चेन्नई) ची परीक्षा यशस्वीरित्या पास होऊन, एक एक वर्ष कालावधीचा  कठीण अभ्यासक्रम पूर्ण केला यानंतर ते कर्नल या पदासाठी पात्र झाले. मागील सर्व कारकीर्दीच्या आढावा घेतल्यानंतर, कर्नल पदासाठी त्यांचे सिलेक्शन झाले. नुकताच समारंभपूर्वक त्यांना कंपनी कमांडरचा चार्ज दिला गेला. राघवेंद्र यांचे वडील आरसीएफचे निवृत्त अधिकारी आहेत आणि आई सामाजिक कार्य करणार्‍या गृहिणी आहेत. 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top