अलिबाग 

  कु-कू-च-कु या  पोल्ट्री फार्म उद्योगाने अलिबाग येथील इनिशलाईझ ग्रुपच्या माध्यमातून एक अद्ययावत मोबाइल ऍप तयार केले आहे. या अ‍ॅॅपच्या माध्यमातून अगदी घरबसल्या फक्त एका क्लिकवर ताज्या चिकनची ऑर्डर बुक करू शकता आणि तेही अगदी घरपोच मिळणार असल्याची माहिती पोल्ट्री उद्योगातर्फे देण्यात आली आहे.

यापुढे सर्व अलिबागकरांना अगदी त्यांच्या दारात घरपोच सेवा देण्याचा कंपनीचा मानस असून समस्त चिकनप्रेमी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कु-कू-च-कु आता सिद्ध झाले आहे. हे अ‍ॅॅप अलिबागमधील नामांकित अशा इनिशलाईझ ग्रुप, वेब डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग या कंपनीने तयार केले असून ग्राहकांच्या सोयीनुसार यात अनेक इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत.   हे अ‍ॅॅप   मोबाइलमध्ये  डाउनलोड करण्यासाठी  गूगल प्ले स्टोअरवर कु-कू-च-कु ऑनलाईन चिकन सर्च करा किंवा खाली दिलेली लिंक वेब ब्राउझरमध्ये कॉपी पेस्ट करा. https://bit.ly/3cZzPDd