Friday, March 05, 2021 | 06:01 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कर्जतमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उत्सव साजरा
रायगड
23-Feb-2021 03:31 PM

रायगड

नेरळ | वार्ताहर

कर्जत शहरातील तुलसी अंगणमधील महिला मंडळाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उत्सव साजरा केला. समता परिषदेचे  साजना भुजबळ आणि कमल जाधव यांनी महिलांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सावित्रीबाई फुले यांनी सर्व पारंपरिक बंधने तोडली, शिक्षणातून जीवनातील स्वतंत्र विचार निर्भीडपणे मांडता येणारे शैक्षणिक क्रांती घडवू शकतात. मनुष्यात असलेले चांगले-वाईट गुण आईच्या दुधातून तिच्या सहवासातून, शिक्षणातून संस्कारातून येतात. त्यामुळे यापुढे जयंती साजरी न करता उत्सव साजरा केला पाहिजे, असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेऊन आपले मत व्यक्त केले.

कर्जतमध्ये प्रथमच  सावित्रीबाई फुले उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मीना थोरवे, शुभांगी लाड, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, सुरेखा पुजारी, मनीषा भासे, अर्चना हगवणे, मनीषा अथणीवर, स्नेहा पिंगळे, शर्वरी कांबळे, स्नेहा गोगटे आदी महिलांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top