रायगड
नवी दिल्ली
नवी दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन होत असताना पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कॉलरला पोलिसांनी हात घातला. त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते संतापले. त्यातून पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी शेट्टी यांनी केंद्र शासनावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधानांबरोबरच शेट्टी यांनी गृहमंत्र्यांवरही टीका केली.
नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळालं. आंदोलनाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा आणण्यात आला होता. मात्र हा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे काही अवशेष गोळा केले आणि ते पेटवून दिले. यातून पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. या गोंधळात पोलिसांनी शेट्टी यांच्या कॉलरला हात घातला. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच खवळले. या प्रकाराचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या झालेल्या प्रकारामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. शेतकर्यांना खलिस्थानवादी ठरवणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसांत दिल्लीतील शेतकर्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटून उठेल.
राजू शेट्टी,स्वाभीमानीचे नेते