खोपोली,

   पेण अर्बन बँक घोटाळ्याला गुरुवारी ( 22 सप्टेंबर )  दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. याविरोधात पेण अर्बन बँक ठेवीदार,खातेदार संघर्ष समितीने न्यायालयीन व लढा व आंदोलने करीत मोठ्या प्रमाणात जप्त करून दिलेली मालमत्ता विक्री करून ठेवीदारांचे पैसे द्या असा निर्णय हायकोर्ट व उच्च न्यायालयाने देऊनही अमंलबजावणीसाठी सहकार व प्रशासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेध करीत संचालक शिशिर धारकर यांच्या  फोटोला जोडे मारो आंदोलन करीत तसेच  मयत  ठेेेेविदारांचे पोस्टर दाखवत आंदोलन करण्यात आले.

  पेण अर्बन बँक ठेवीदार,खातेदार संघर्ष समितीच्या वतीने   खोपोली बँकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,पालिकेचे गटनेते नगरसेवक सुनिल पाटील, संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, बाबूभाई ओसवाल, शिरीष बिवरे, प्रकाश सावंत यांच्यासह तालुक्यातील ठेवीदार उपस्थित  होते.यावेळी  दहा वर्ष तडफणार्‍या ठेविदारांना न्याय द्या,बँक बुडव्या प्रमुख आरोपींना पुन्हा जेरबंद करा तसेच ठेविदारांना न्याय देण्यास टाळाटाळ करणार्‍या शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

  पेण बँकेच्या संचालकांनी जमिनी खरेदीसाठी 40 ते 45 कोटी खर्च बाकीची रक्कम अपहार केलेली आहे. आपहार केले रक्कम वसूल करा असे आदेश उच्च न्यायालयने सन-2015 साली दिले आहेत.संघर्ष समितीने न्यायालीन लढा देत रायगड जिल्ह्यातील पेण,पनवेल,पाली,बीड आणि राजस्थान शासनाला मालमत्ता जप्त करून दिल्या आहेत.या सर्व मालमत्ता विक्री करून ठेविदारांचे पैसे द्या असा हायकोर्टाने व उच्च न्यायालयाचे आदेश आहेत परंतु सहकार,पोलिस आणि प्रशासन यंत्रणा करावाई करीत नसल्याची खंत कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.पेण बँकेचा लढा शेवटच्या श्‍वासापर्यत लढण्यासाठी सर्वेतोपरी मदत करणार असल्याचे शब्द माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी दिला असता नगरसेवक सुनिल पाटील यांनी दुजोरा दिला आहे.तर दि.8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाला यश आले असून दि .30 सप्टेंबर रोजी कोकण भवन येथे बैठक लावली असल्याचे सांगत रायगड जिल्हाधिकारी व एस.पी यांनी पेण संघर्ष समितीला सकारात्मक बाजू दिल्याबद्दल शिरीष बिवरे यांनी आभार व्यक्त केले.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त