खरोशी

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निसर्ग चक्रीवादळाने पेण तालुक्यातील खरोशी गावाला चांगलाच तडाखा देऊन लाखोंची हानी झाली आहे.

 दुपारी बाराच्या सुमारास वादळीवार्‍यासह जोरदार पावसामुळे खरोशी गावातील 40 ते 50घरावरील कौले उडाली.तर बागवाडीतील दहा पंधरा घरांचे नुकसान झाले.मंदीरावरील पत्रे उडाले स्मशानभुमी वरील पत्र्याचे शेड उडून गेले. संडास बाथरुम वरील पत्रे उडाले शाळेच्या वरची काही ठिकाणची कौले उडाली काही ठिकाणी झाडे घरावर पडली रस्त्याच्या लगत असलेली  डी.पी(विद्युत जनित्र) पूर्णपणे जमिनदोस्त होऊन उखडून पडली.खरोशी गावात तीन चार पोल पडले तर बागवाडी नजीक डोंगर माथ्याच्या वरच्या बाजूला सात ते आठ विजेचे खांब कोसळले. गेली चार पाच दिवस गावातील वीज बंद आहे.तसेच खरोशीफाटा तेखरोशीगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडली.एकदरीत कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान खूप झाले आहे.प्रशासनाने दिलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.तरी नुकसान झालेल्या नागरिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी खरोशी गावातील नागरिकांनी केली आहे.

अवश्य वाचा