नेरळ,

 कर्जत तालुक्यात कोरोनाची संसर्ग वाढत चालला आहे,त्यात खासगी वैद्यकीय क्षेत्रातील  डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह बनले आहेत.त्यामुळे त्यांना नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ साईमंदिर परिसरात असलेला दवाखाना 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.तर आज कोरोना चे 5 नवीन रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 133 इतकी झाली आहे.

  वंजारपाडा येथील 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करणारे नेरळ साई मंदिर परिसरातील 45 वर्षीय डॉक्टर हे आज कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.नेरळ-कळंब रस्त्यावर साइ मंदिर परिसरात असलेले त्या डॉक्टरांचे हॉस्पिटल पुढील 15 दिवस बंद राहणार आहे.काल कोरोना पॉझिटिव्ह झालेला रुग्ण त्या डॉक्टरांचे हॉस्पिटलमध्ये तीन दिवस उपचार घेतले होते.त्यामुळे आरोग्य विभागाने त्या डॉक्टरांकडे आलेल्याची यादी ताब्यात घेतली असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष ठेवले आहे. दुसरीकडे चिंचवली येथील केश कर्तनालय चालविणार्‍या तरुणाला कोरोना ची लागण झाली होती.त्या सलून चालकाचे संपर्कात आलेल्या चिंचवली गावातील एका 29 वर्षीय तरुणाचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.तर बोरवाडी येथील उत्तर कार्य मधील सहभागी पाली वसाहत तरुणाचे घरातील एका पाच वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

  कर्जत शहरातील मुद्रे येथील आणखी तिघांना कोरोना ची लागण झाली आहे.त्यात कर्जत शहरातील नेमिनाथ अपार्टमेंट मधील 25 वर्षीय तरुण याला कोरोना ची बाधा झाली आहे.हा तरुण ठाणे येथे नोकरी करण्यासाठी दररोज जात असून तो कोरोनाग्रस्त झाला आहे.तर मुद्रे भागातील स्वप्ननगरी भागातील आणखी दोन जणांना कोरोना ची बाधा झाली आहे.त्यात 48वर्षीय पुरुष आणि 45 वर्षीय स्त्री रुग्णांचा समावेश आहे.कर्जत तालुक्यात आज च्या 5 नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 133 वर पोहचली आहे.

 

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस