उरण,

 कोरोना कोविड 19 चा प्रादुर्भाव उरण मधील करंजा गावात मोठ्या प्रमाणात जाणवला होता. आता परिस्थिती आटोक्यात येऊनही करंजा गावातील ग्रामस्थांना बाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याने करंजा गावातील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.

    कोरोना कोविड 19 चा प्रादुर्भाव करंजा गावातील सुरकीच्या पाड्यापासून झाली. त्याचा प्रादुर्भाव गावात पसरल्याने 100 ते 125 कोरोना पॉजेटीव्ह आढळून आले होते. त्यातील बहुतांश पॉजेटीव्ह कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूपणे परतले आहेत. असे असतानाही  गावातील ग्रामस्थांना गावाच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई हुकूम आहे. ज्यांना कोणाला गावाबाहेर जायचे असेल त्यांना पास घेऊनच जावे लागत आहे. पास ही दररोजचा घ्यावा लागत आहे.  तो पास मिळविण्यासाठी एक ते दोन तासाचा अवधी लागत आहे. त्यावेळेत सदर व्यक्ती उरणहून आपले सामान घेऊन घरी सुखरूपपणे घरी येऊ शकतो असे ग्रामस्थ सांगतात.

     गावात ठराविकच सामान मिळत आहे. त्यामुळे इतर सामान हे उरण शहराशिवाय मिळू शकत नाही. ते आणण्यासाठी उरणला जायचे म्हणजे पासची गरज आहे. पास घेण्यासाठी गेल्यावर कशाला जायचे आहे, कोणते सामान आणावयाचे आहे, याची सर्व चौकशी पास देणारा अधिकारी वर्ग करीत असतात व ज्यांचा वशिला दांडगा त्यांना मात्र पास लगेच मिळत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. परंतु ज्यांना खरोखरच पासची गरच असते असे सर्वसामान्य माणूस मात्र वंचीत रहाताना दिसत आहे. असा भेदभाव केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.

    करंजा गावातील कोरोना पॉजेटीव्हचा आकडा आता जवळपास संपल्यातच जमा आहे. यामुळे गावबंदी करण्यात आली होती. यामुळे ग्रामस्थांची नाराजीचा सूर निघत आहे. तरी शासकीय अधिकारी वर्गानी आता कायद्याच्या कचाट्यात ग्रामस्थांना वेठीस न धरता खरोखर ज्यांना गरज आहे. अशांना उरणमध्ये खरेदीसाठी जाण्यासाठी कोणतेही आडेवेडे न घेता देण्यात यावेत. अन्यथा त्याचे परिणाम उलट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सारासार विचार शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांनी करून यातून मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

अवश्य वाचा