Thursday, January 21, 2021 | 12:23 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

बनावट धनादेशाद्वारे जॉन्सन कंपनीची फसवणूक
रायगड
13-Jan-2021 02:16 PM

रायगड

। वडखळ । वार्ताहर ।

वडखळ: प्रिझम जॉन्सन कंपनीच्या हरवलेल्या क्रॉस धनादेशाची नक्कल करुन बनावट रबरी शिक्का तयार करुन त्याद्वारे 2 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.पोटे मार्ग ता. पेण चे रहिवासी हे काम करीत असलेल्या प्रिझम जॉन्सन लिमीटेड कंपनीच्या इंडीयन ओव्हरसिस बँक शाखा नौपाडा ठाणे या बँकेतील प्रिझम जॉन्सन लिमिटेड कंपनीच्या खात्यात दोन लाख 65 हजार पाचशे रूपयांचा क्रॉस चेक मारूती कुरियर कंपनीकडून हरवला होता. तोच चेक एका अज्ञात व्यक्तीला सापडला व त्याने त्या चेक सारखा दिसणारा बनावट चेक तयार केला. त्यावर फॉर प्रिझम जॉन्सन लि.एच.अँड आर जॉन्सन इंडिया डिव्हिजन ऑथोराईज सिग्नेटरीज या नावाचा रबरी स्टॅम्प तयार केला. तो त्याने बनावट केलेल्या चेकवर उमटवून त्यामध्ये फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीचे हेड ऑफिसमध्ये अकाउंट हेड यांच्या डुप्लीकेट सहया करून सदरचा बनावट चेक याने इंडियन ओव्हरसिस बॅक शाखा सातुपल्ली जिल्हा खम्मम राज्य तेलंगना या बँकेत जमा करून रोख रक्कम घेवून कंपनीची फसवणुक केली. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top