नेरळ 

कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्ह्याचे शेवटच्या टोकावर असणार्‍या झुगरे वाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले होते. या शाळेच्या उभारणीसाठी रोटरी क्लबने आर्थिक मदत उभी करून दिली आहे. त्या माध्यमातून झुगरेवाडी शाळेची इमारत पुन्हा नव्या दमाने उभी राहिली आहे.

3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर कर्जत तालुक्याला मोठ्या प्रमाणात झाडे आणि घरांचे नुकसान झाले होते. त्यात तालुक्यातील 150 हुन अधिक शाळांचे नुकसान झाले असून शेवटच्या टोकावर असलेल्या झुगरेवाडी शाळेचे छतावरील पत्रे, पाण्याची टाकी, पाईप लाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामा झाला असला तरी शासकीय वास्तू असल्याने मदत मिळण्यास किती काळ लागेल हे सांगता येत नव्हते आणि त्यात छपरच उडाल्याने पावसाळी दिवसात शाळेची इमारत आणखी क्षतिग्रस्त होऊ शकते. त्यामुळे सहकार आयुक्त प्रदीप महाजन (नाशिक) यांच्या व्हाट्सएपच्या समूहावर शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी शाळेच्या नुकसानी बाबत फोटो टाकून मदतीसाठी आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या रोटरी  दिशा ट्रस्ट चे सदस्य विजयजी नाझरे यांनी तातडीने मदतीचे आश्‍वासन दिले.तसेच आवश्यक ती मदत वेळेत मिळाल्याने छतावर नवीन पत्रे  बसविण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय झाली त्यामुळे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी रोटरी दिशा ट्रस्ट च्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....