Thursday, December 03, 2020 | 11:59 AM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

केंद्राच्या विरोधात 26 नोव्हेंबरला भारत बंद
रायगड
28-Oct-2020 08:10 PM

रायगड

अलिबाग 

 केंद्राच्या  शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून येत्या  26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. प्रस्तावित शेतकरी व कामगार विरोधी कायद्या विरोध राज्यातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी एकत्र यावे असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

  पुणे येथे  बुधवारी 28 ऑक्टोंबर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती बैठक पार पडली. देशातील 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्‍चित झाले आहे. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकर्‍यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणार्‍या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. या वेळी माजी. खासदार राजू शेट्टी, कॉ. डॉ. अशोक ढवळे,  कॉ. बाबा आढाव,  प्रतिभा शिंदे, राजेंद्र कोरडे,  राहुल पोकळे, किशोर ढमाले, चंद्रशेखर पाटील,  मोहन गुंड, संपतराव पाटील,  सागर आल्हाट, नितीन बनसोडे आदी उपस्थित होते.

26 व 27 नोव्हेंबर 2020 रोजी होणार्‍या देशव्यापी कार्यक्रमाचे   नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.  26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी बैठका होत आहेत, 18 नोव्हेंबरल अलिबाग येथे पुढील बैठक पार पडणार आहे.

आम. जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top