Thursday, December 03, 2020 | 01:36 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

खालापूर नगर पंचायतीच्या विकास कामांचे उद्घाटन संपन्न
रायगड
27-Oct-2020 06:43 PM

रायगड

खोपोली 

 खालापूर नगर पंचारतीने विविध फंडातून मंजूर करून आणलेल्या जवळपास 1 कोटी रूपये खर्चातून केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन  आमदार महेंद्र थोरवे, आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले.

खालापुर पोलिस स्टेशन पासून ते साबाई माता मंदीर वॉल्मिकवाडी जाणार रस्ता मजबुतीकर अंदाजे रक्कम 34 लाख 6 हजार 542 रुपये, मौजे वणवे येथील वणवेवाडी अंतर्गत परिसरात सिमेंट कॉक्रिटिकरण अंदाजे रक्कम 21 लाख 18 हजार 470 रुपये.मौजे वणवे येथील खोंडावडी अंतर्गत परिसरात सिमेंट कॉक्रीटीकरण करणे अंदाजे रक्कम 19 लाख 75 हजार 727 रुपये.मौजे वणवे येथील मेन रोड ते दत्तमंदीर कडे जाणारा रस्ता सिमेंट कॉक्रीटिकरण अंदाजे रक्कम 10 लाख 4 हजार 529 रुपये.मौजे शिरवलीवाडी अंगणवाडी ते पवार यांचे घरापर्यंत गटारा बांधणे अंदाजे रक्कम 3 लाख 9 हजार 444 रुपये.मौजे खालापूर येथील बाळा भगत ते विहीरीकडे जाणारा रस्ता सिंमेट कॉक्रीटीकरण करणे अंदाजे रक्कम 2 लाख 5 हजार 382 रुपये.मौजे खालापूर येथील अभी ठाकूर ते धर्माशेठ चाळीपर्यत जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे अंदाजे रक्कम 2 लाख 99 हजार 510 रुपये. अशा विविध नागरी सुविधा पुरविणार्‍या कामांचे उद्घाटन आज करण्यात आले.

 यावेळी   नगराध्यक्षा रेणुका पवार, उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,  मुख्याधिकारी सुरेखा भगणे, हक्युलस होईस्टस लि.बजाज कंपनीचे  .सी.ई.ओ. प्रकाश सुब्रमन्यम , व्हाईस प्रेसिडेंट विवेक महेन्द्र, जनरल मॅनेजर कैलास मेनन, कंपनी सेक्रेटरी कैलास मुकादम, नगरपंचायत सभापती मंगला चाळके, ममता चौधरी, राहुल चव्हाण, गटनेते दिलीप मणेर, नगर अभियंता देवेंद्र मोरखंडीकर, नगरसेवक संतोष जंगम, अवधूत भुर्के, कर्जतचे नगरसेवक संकेत भासे, शेकाप तालुका चिटणीस संदीप पाटील, अविनाश तावडे, राजेश अभाणी, रामदास पाटील,दिनेश फराड आदिसह अन्य नगरसेवक, खालापुर ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top