रायगड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात आज दोन रुग्णांना बरे वाटल्याने कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. तर नव्याने दोन रुग्णाची नोंद झाली आहे.बुधवारी अलिबाग तालुक्यात नव्याने रेवस येथील दोन रुग्णाची नोंद झाली आहे. तर बरे वाटल्याने चेंढरे येथील दोन रुग्णांना कोरोना मुक्तघोषित करण्यात आले आहे.आतार्यंतच्या रुग्णसंखेनुसार तालुक्यातील एकूण रुग्ण 5 हजार 148 झाले असून त्यापैकी 141 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 हजार 980 जण कोरोनामुक्त झाले तर सद्यस्थितीत 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.