जेएनपीटी 

स्पिडी या कंटेनर यार्ड परिसरातील रस्त्यांवर सध्या पावसाळ्यात मोठे मोठेे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या प्रवाशी नागरीकांना, वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तरी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने सदर रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी येथील कामगार वर्ग करीत आहेत.

जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीत असलेल्या सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील स्पिडी या कंटेनर हाताळणी करणार्‍या यार्डमध्ये देश परदेशातील मालाची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ ही सुरू असते. परंतु सध्या पावसाळ्यात खड्डे रस्त्यावर पडल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या प्रवाशी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने सदर रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी या ठिकाणचे कामगार वर्ग करीत आहेत.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद