जेएनपीटी  

चिरनेर गावातील मोबाइल ग्राहकांना सेवा पुरविणार्‍या आयडिया कंपनीची सेवा कोलमडल्याने हजारो आयडिया ग्राहकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर हे ऐतिहासिक प्रसिद्ध गाव असून, या गावातील रहिवासी हे मोठ्या प्रमाणात आयडिया आणि जीओ या कंपनीचे नंबरचे सिमकार्ड मोबाइल फोनमध्ये वापरत आहेत. त्यात जीओ सिमकार्ड मोबाइलधारकांना नेटवर्कर उपलब्ध होत नसल्याने सर्रास मोबाइलधारक ग्राहक हे आयडिया कंपनीचे सिमकार्ड वापरत आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरात राहणार्‍या नागरिकांमुळे आयडिया कंपनीच्या सिमकार्डसना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असताना, आयडिया कंपनीचे नेटवर्कर वारंवार खंडित होत आहे.

एकंदरीत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वारंवार आयडिया कंपनीची नेटवर्क सेवा कोलमडत असल्याने हजारो आयडिया सिमकार्ड मोबाइल फोनधारकांमध्ये सध्या नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. तरी आयडिया आणि जीओ सिमकार्डधारकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मोबाइल फोनधारक ग्राहक करत आहेत.