अलिबाग 

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ङ्गगुगल असिस्टंटफवर आपल्या ग्राहकांसाठी ग्राहक सेवा चॅटबॉट सुरू केले आहे. यामुळे कंपनीच्या विमाधारकांना ङ्गओके गुगल, आय वाँट टु स्पीक टु आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लिगोफ किंवा ङ्गमे आय टॉक टु आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ लिगोफ अशा सोप्या व्हॉइस कमांड्सद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून घेता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी नाविन्यपूर्ण व सोयीस्कर सुविधा लाँच केली आहे. गुगल असिस्टंटवर लिगो सेवेचा विस्तार करणे हा ग्राहकांच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत असण्याच्या आणि त्यांना उपयुक्त अनुभव देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा एक भाग आहे.

ग्राहकांना त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर ङ्गगुगल असिस्टंटफ सक्रिय करून व आपल्या विमा योजनेचा क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाइलचा क्रमांक देऊन त्यांच्या विमा योजनेविषयी माहिती घेता येणार आहे.

अवश्य वाचा