Monday, March 08, 2021 | 09:31 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सुटे दाम्पत्य गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
रायगड
20-Jan-2021 07:25 PM

रायगड

। गोवे कोलाड ।  वार्ताहर । 

आविष्कार फाऊंडेशन इंडिया (कोल्हापूर -महाराष्ट्र राज्य) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात गेली 14 वर्षे कार्यरत आहे. या संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तचे औचित्य साधून देशातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. 

या अनुषंगाने पुरस्कारासाठी रोह्याचे शिक्षक विलास रामचंद्र सुटे (पदवीधर शिक्षक) राजिप शाळा तळाघर व त्यांची सपत्नी विनया विलास सुटे सहशिक्षिका कोएससो यांची आविष्कार फाऊंडेशनकडून राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार व त्यांच्या सौभाग्यवती शिक्षिका राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2021 करिता निवड करण्यात आली. हा पुरस्कार गणपतीपुळे रत्नागिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करून सुटे दाम्पत्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आविष्कार फाऊंडेशन इंडियाचे कोकण विभाग अध्यक्ष आबासाहेब पवार, रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, केंद्रप्रमुख संघटना रायगड जिल्ह्याध्यक्ष संदीप जामकर, जावळी हायस्कूलचे पदवीधर शिक्षक मंगेश बुटे आदी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top