Wednesday, December 02, 2020 | 12:03 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

बोर्लीपंचतन आगरी समाजातर्फे गुणवंताचां सन्मान
रायगड
21-Nov-2020 06:19 PM

रायगड

कापोली 

 श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील अखंड आगरी समाजाच्या वतीने गुणगौरव व सेवा निवृत कर्मचारी सत्कार समारंभ  सोशल डिस्टन्सीगचे पालन करून  मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

विद्यार्थी गुण गौरव व सेवा निवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ कार्यक्रमाची सुरवात बोर्लीपंचतन येथील अखंड आगरी समाजातील  खोती पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वन करून उपाध्यक्ष कृष्णकांत पाटील व खजिनदार राजेंद्र पयेर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मुर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अखंड आगरी समाजाचे विद्यमान अध्यक्ष व साई पतसंस्था बोर्लीपंचतनचे सचिव चंद्रकांत धनावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

  समाजाचे सचिव प्रशांत अ. पाटील यांनी प्रास्ताविक केले.यावेळी अध्यक्ष चंद्रकांत धनावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अखंड आगरी समाजातील सर्व पदाधिकारी, समाज बांधव व दहावी,बारावी पंधरावीचे उत्तीर्ण विद्यार्थी उपस्थित होते. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top