बोर्लीपंचतन

 निसर्ग   चक्रीवादळामध्ये  झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने श्रीवर्धन,म्हसळा तालुक्यातील जनतेला मिळावी,अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

श्रीवर्धनच्या दौर्‍यावर आलेल्या पंडित पाटील यांनी श्रीवर्धनचे प्रांत अमित शेडगे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन नुकसानग्रस्तांच्या भरपाईबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी श्रीवर्धन ता,चिटणीस वसंत यादव, म्हसळा ता,चिटणीस संतोष  पाटील,  स्वप्निल बिराडी, तुकाराम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ते सोशल डिस्टन्सिंगचे पालनही काटेकोरपणे करण्यात आले.

यावेळी झालेल्या चर्चेत पंडित पाटील यांनी  दोन महिने होऊनही नुकसानीबाबत श्रीवर्धन म्हसळा येथील काही जनता अजुन  नुकसानभरपाई पासून वंचित असल्याचे  प्रांत अमित   शेडगे यांच्या निदर्शणास आणले.तातडीने नुकसानग्रस्तांना ही भरपाई प्राप्त व्हावी,अशी मागणीही त्यांनी केली.

 माजी आमदार पंडित पाटील यांच्या मागणीची  प्रांत शेडगे यांनीही दखल घेत जे वादळग्रस्त आहेत त्यांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्याचे मान्य केले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद