अलिबाग

जिल्हा रुग्णालय, अलिबागमधील एक्स-रे विभागाकरिता सीआर यंत्रणा उपलब्ध झालेले आहे. सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून सदरील यंत्रणेसाठी यूपीएस खरेदीकरिता अनुदान उपलब्ध झालेले नसल्याने व तातडीने यूपीएसची आवश्यकता असल्याने तो देणगी स्वरुपात मिळाल्यास रुग्णसेवेस सहकार्य होऊ शकते, अशी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने लायन्स क्लब अलिबागला विनंती करण्यात आल्यामुळे 30 हजार रुपयांचा युपीएस लायन्स क्लबने खरेदी केला आणि तो जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आला. लायन्स क्लब अलिबागच्या या बहुमोल मदतीने जिल्हा रुग्णालयाने कोरोनाशी सुरु केलेल्या लढ्याला बळ मिळाले आहे.

पोर्टेबल एक्स रे मशीन आणि डिजीटल सीआर सिस्टम ही दोन्ही उपकरणे कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महत्वाची उपकरणे आहेत. पोर्टेबल एक्स रे मशीन कोरोना रुग्ण कक्षात नेता येत असल्याने रुग्णाला एक्स रे काढण्यासाठी एक्स रे विभागात आणण्याची गरज नसते. यामुळे एक्स रे विभागातील इतर सामान्य रुग्णांना किंवा कर्मचार्‍यांना कोरोनाचा  संसर्ग होण्याची शक्यता टाळता येते. मात्र या मशिन्सच्या सुरक्षित कार्यप्रणालीसाठी लागणारे युपीएस रुग्णालयामधे उपलब्ध नव्हते. युपीएस शिवाय या मशीनचे इंस्टॉलेशन होणे शक्य नव्हते. तीस हजार रुपयांच्या युपीएसविना लाखो रुपयांची एक्स रे सिस्टम पडून राहण्याची स्थिती निर्माण झाली. अशावेळी सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे लायन्स क्लबचे सदस्य यावेळी पुढे आले.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!