नेरळ :

नेरळ गावातील तरुणांनी स्थापन केलेल्या वाय फॉर डी या संस्थेकडून कर्जत तालुक्यातील दोन आदिवासी वाद्यांमध्ये जाऊन गरजूंना धान्याची मदत करण्यात आली.ही संस्था गेली अनेक वर्षे मदत करण्याचे काम करीत असून लॉक डाऊन काळात आदिवासींचा हरवलेला रोजगार यामुळे त्यांना मदत करण्यात आली.

कोरोना या महामारीमुळे संपूर्ण जगासह भारतावरही आर्थिक संकट कोसळले असून हातावर पोट असलेला मजूर वर्ग यात सर्वात जास्त होरपळत आहे.त्यामुळे नेरळ येथील वाय फॉर डी फाउंडेशनने कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मध्ये जाऊन तेथील आदिवासी लोकांना धान्याचे किट वाटप करून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. पोही येथील आदिवासी कुटुंब आणि वारे जवळील करकुल वाडी तसेच अन्य आजूबाजूच्या वाड्यांमध्ये जाऊन ही मदत पोहचवली.या प्रसंगी प्रथमेश कर्णिक,श्याम कडव,तुषार भोईर आणि राम काळे यांच्यासह फाऊंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित होते.असा अचानक मदतीचा हात मिळाल्याने ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....