श्रीवर्धन 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दि.21 व 22 सप्टेंबर रोजी कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस  कोसळला. श्रीवर्धन तालुकाही याला अपवाद नाही. श्रीवर्धनमध्ये गेले तीन - चार दिवस दिवसाच्या पूर्वार्धात बर्‍यापैकी उघडीप असते. पण संध्याकाळचे दोन-तीन तास मात्र ढगफुटी झाल्याप्रमाणे सलग पाऊस कोसळत असतो. श्रीवर्धनला समुद्र असल्यामुळे शहरात

कधीही दोन - तीन तासांच्या वर पाणी साठून रहात नाही. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजारपेठ  येथे काही जागी पाणी तुंबले होते.

तहसिल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यासाठी 2762 मि.मी पावसाची वार्षिक सरासरी आवश्यक असताना यंदा मात्र दि. 23 सप्टेंबरपर्यंत 3911 मि.मी.पाऊस पडला आहे. हा पाऊस जास्त वाटत असला तरी गेल्या वर्षीही प्रचंड

पाऊस पडला होता. गेल्यावर्षी दि. 23 सप्टेंबरपर्यंतची  पावसाची नोंद 3987 मि.मी.इतकी होती. यंदाचा पाऊस गत वर्षीच्या पावसापेक्षाही काही प्रमाणात कमीच आहे, असे दिसून येते. 

 

अवश्य वाचा