मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. राज्यात पुणे, लातूर परभणी, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव, सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले असून त्यामुळे गावांतही पाणी शिरलं आहे. तर अनेक ठिकाणी शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणं तुडूंब भरली आहेत. मुंबईवरीलही पाणी कपातीचं संकट टळलं असून मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणं भरली आहेत.मराठवाड्यातील उस्मानाबादेत मुसळधार झाला आहे. पंढरपुरातही पावसाची दमदार हजेरी लावली होती. लातूर जिल्ह्यातील औसा परिसरात रात्री जोरदार पाऊस पडल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.  

सांगलीतही पावसाचं थैमान असून  आटपाडी तालुक्यातील भागात आजपर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. आधीच कृष्णा नदीतून वाहून जाणार्‍या पाण्याने टेंभू योजनेच्या माध्यमातून या भागातील तलाव, बंधारे भरून घेण्यात आले होते. त्यामुळे या पावसाने लगेच पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.   पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली अ

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त