Wednesday, May 19, 2021 | 12:53 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

बोर्लीमध्ये गटारे तुंबल्याने आरोग्याचा प्रश्‍न
रायगड
04-Apr-2021 06:35 PM

रायगड

। कोर्लई । प्रतिनिधी ।

गेल्या अनेक महिन्यांपासून मुरुड तालुक्यातील बोर्ली स्थानकावरील गटारे तुंबल्याने प्रवासी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असून तुंबलेल्या गटाराची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजा सोडेकर यांनी केली आहे.

बोर्ली स्थानकावरील निवारा शेडलगत असलेल्या या गटारात गेल्या अनेक महिन्यांपासून कचरा, घाण व प्लॅस्टिक बाटल्यांचा खच पडलेला आहे. यामुळे परिसरात सुटलेल्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या भागत पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असते. यापुर्वी अपना बाजार समोर असलेली मोरी बुजविण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याच्या निचरा होत नाही. परिणामी येथील गटारे तुंबल्याने होणार्‍या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन बोर्ली स्थानकावरील तुंबलेल्या गटाराची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजा सोडेकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top