नेरळ

कर्जत तालुक्यातील माणकिवली गावातील ओम बजरंग तरुण मंडळातील युवकांनी गावातील पुरातन हनुमान मंदीराची आणि परिसराची स्वच्छता केली.

मानकीवली गावातील पुरातन हनुमान मंदिरातील फरशांमध्ये पडलेल्या मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या.तसेच अन्य दुरुस्ती करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर गंगावणे यांनी तरुणांना आवाहम केले होते.गावातील तरुणांनी एकत्र येत भेगांमध्ये हाताने सिमेंट भरून भेगा भरुन घेतल्या. मंदिरातील फरशांमध्ये भेगा पडल्यामुळे मंदिरात किड्या मुंग्याचे वारुळ तयार होत होते. मंदिर आणि मंदिराच्या आजुबाजूच्या परिसरातील स्वच्छता केल्याने हनुमान मंदिर आणि परिसर स्वच्छ केले. तसेच मंदिर उभारण्यावेळी बांधलेल्या एका खिडकीला वारुळ लागुन ती खिडकी पुर्णतः खराब आणि धोकादायक झाली होती.मंदिरातील खराब झालेली खिडकी पाहुन मंडळाचे सदस्य ओमकार पवार यांनी खिडकी दुरुस्त करण्यासाठी सिमेंट,कडप्पा व स्टाईल लादी उपलब्ध करून दिली.

वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे ह्या मुलमंत्राने प्रेरीत होऊन ओम बजरंग तरुण मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक कार्यकर्ते मधुकरभाऊ गंगावणे यांनी केलेल्या आवाहनामुळे हनुमान मंदिर आणि परिसराच्या स्वछता मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच कडाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष मुकणे आणि त्यांचे दोन चिरंजीव विजय मुकणे व रोहित मुकणे ह्यांनीही मंदिरातील स्वच्छता कार्यास आणि मंदिरातील खिडकी दुरुस्तीची कामे केली.गावातील हनुमान मंदीराच्या स्वच्छता आणि दुरुस्ती प्रसंगी मंडळाच्या युवकांनी केली.सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गंगावणे,माजी सरपंच संतोष मुकणे,अंकुश गंगावणे, प्रफुल गंगावणे, ओमकार पवार, आकाश गंगावणे, प्रशांत पवार, सुमित पवार, विजय मुकणे, रोहित मुकणे, गणेश पवार, एकाच नावाचे दोन बालसदस्य समर्थ गंगावणे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अवश्य वाचा